Wednesday, 6 December 2017

बारा मावळे - बारा मावळ पुण्याखाली बारा मावळ जुनराखाली असे तानाजी मालुस-याच्या पोवाडयांत म्हटले आहे. हिरडस मावळांतील बांदल देशमुखाच्या एका सनदपत्रांत (१६१४) बारा मावळे हे शब्द आहेत असे रा. राजवाडे सांगतात. शिवाजीच्या वेळी जुन्नरापासून चाकणपर्यंत पुण्यापासून शिरवळापर्यंत चोवीस मावळे प्रसिध्द होती.
जुन्नरापासून चाकणपर्यंत पुढील मावळे प्रसिध्द होतीः- () शिवनेर, () जुनेर, () मिननेर, () घोडनेर, () भीमनेर, () भामनेर, () जामनेर, () पिंपळनेर, () पारनेर, (१०) सिन्नर, (११) संगमनेर (१२) अकोळनेर. ही बारा नेरे-नेहेरे उर्फ मावळे प्रसिध्द आहेत.

पुण्याखालील बारा मावळे पुढीलप्रमाणे आहेत - () अंदरमावळ, () नाणेमावळ, () पवनमावळ, () घोटणमावळ, () पौडखोरे, () मोसेमावळ, () मुठेमावळ, () गुंजळमावळ, () वेळवंडमावळ, (१०) भोरखोरे, (११) शिवतरखोरे (१२) हिरडसमावळ

No comments:

Post a Comment