Tuesday, 19 December 2017

अर्पण आणि दान >
Offer – Donation >
अनेक मंदिरात दान पेट्या ठेवलेल्या असतात ०
वृत्तपत्रात ठळक बातम्या येत्तात ०
अमुक व्यक्तीने तमुक मंदिरास इतके रुपये दान दिले/केले ०
शिरडी साई बाबाना सोन्याचा अंगरखा दान दिला ०
हा तद्दन मूर्खपणा होय ०
दान हे केवळ आपल्या पेक्षा लहान ,
दरिद्री ,भिकारी ,अनाथ याना दिले जाते ०
देवास ,ईश्वरास ,स्वामिना ,गुरूस जे आपण देतो,
त्यास अर्पण हा शब्द वापरावा लागतो ०
आपल्यापेक्षा कानिष्ठास दान आणि श्रेष्ठास /जेष्ठास अर्पण ०
दान देताना दात्याचा हात वरती असतो ,
त्याचा तळहात भूमीकडे तर दान घेणाऱ्याचा हात खालती ,तळवा वर असतो
अर्पण करताना नेमकी उलट परीस्थिती असते ०
अर्पण करताना आपली ओंजळ कशी असते पहा ०
अर्पण करताना भक्ती भाव असतो ,विनम्रता आपसूक येते ०
कृपया ही अक्षम्य घोडचूक मुळीच करू नका ०
कोणी केल्यास त्याच्या कानाखाली मनसोक्त मनमुराद ` दान ` करा !
*********************************************************************

Wednesday, 13 December 2017

मराठीतील बोलीभाषा


भारत देशात मराठी बोलणारी माणसे जवळपास सगळ्या राज्यांत विखुरलेली आहेत.
जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची बोलीभाषा दर १२ कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत व वाक्प्रचारांत बदलत रहाते. असे असले तरी लिखित भाषेत फारसा फरक नसतो.
पिढ्या न्‌ पिढ्या विशिष्ट राज्यात स्थायिक झाल्यामुळे मराठी भाषकांच्या यांच्या मूळ मराठी बोलीवर त्या राज्याच्या स्थानिक भाषेचा ठसा सुस्पष्टपणे उमटलेला दिसतो. त्यामुळे ' मी मराठी बोलतो' असे कुणी विधान केले तर ' कुठली मराठी बोलता?' असा प्रश्न आपोआपच उपस्थित होतो. कारण मूळ मराठी भाषेचे व्याकरण जरी एकच असले तरी स्थानमाहात्म्यानुसार मराठी बोलीचे ' कोंकणी मराठी ' - [ हीतही पांचदहा प्रकार आहेत ], कोल्हापुरी मराठी, कारवारी मराठी, अहिराणी, मराठवाडी, नागपुरी, असे अनेकविध प्रकार कानांवर पडत असतात. ह्या प्रत्येक प्रकारात त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकजीवनातले अनेक शब्द आलेले दिसतात, जे लहान शब्दकोषात सापडतीलच असे नाही. [१]भौगोलिक परिसरा नुसार कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बगलांनी, नंदुरबारी, खाल्यांन्गी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी असे बोलींचे आणखी उपप्रकार होतात.

आदिवासी बोलीभाषा[संपादन]

महाराष्ट्रात गोंड, भिल्ल, वारली, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया आदी बोलीभाषा प्रमुख आहेत. या बोलीभाषा महत्त्वाच्या असल्या, तरी यापैकी गोंडी व भिल्ली या बोलीभाषा अतिप्राचीन आहेत. गोंडी बोलीभाषा महाराष्ट्रात प्राधान्याने आणि मध्य भारतातील मोठ्या विस्तृत पट्ट्यात बोलली जाते. चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात व आंध्र प्रदेशाच्या सीमेलगतही गोंडी बोली बोलली जाते. महाराष्ट्रातील आदिवासी बोलींमध्ये गोंडी बोली सर्वाधिक बोलली जाते. गोंडी बोलीला लिपी असल्याचे पुरावेही अलीकडचे काही संशोधक देत आहेत. गोंडी बोलीभाषेचा बारकाईने अभ्यास करणारा जर्मन भाषातज्ञ जूल ब्लाॅच याने गोंडी बोलीची आंतरराष्ट्रीयता शोधून काढण्याचा प्रयत्न केला होता. द्राविडी भाषासमूहातील कोणत्याही भाषेची अभिन्न वैशिष्ट्ये धारण करणारी गोंडी ही एकमेव प्राचीन बोलीभाषा आहे असे मत काॅल्डवेलने गोंडी भाषेच्या सात वैय्याकरणीय कसोट्या लावून मांडले होते.
भिल्ली बोलीभाषा गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये बोलली जाते. या बोलीवर त्या त्या राज्यांच्या प्रमाण भाषेचा प्रभाव असल्याने महाराष्ट्रात ती मराठीची बोलीभाषा म्हणून गणली जाते.

समूहानुसार होणारे उपप्रकार[संपादन]

नंदीवाले, नाथपंथी देवरी, नॉ लिंग-मुरूड-कोलाई-रायगड,पांचाळविश्वकर्मा, गामीत, ह(ल/ळ)बी, माडिया, मल्हार कोळी, मांगेली, मांगगारुडी, मठवाडी, मावची, टकाडी, ठा(क/कु)री, 'आरे मराठी', जिप्सी बोली(बंजारा), कोलाम/मी, यवतमाळी (दखनी), मिरज (दख्खनी), जव्हार, पोवारी, पावरा, भिल्ली, धामी, छत्तीसगडी, भिल्ली (नासिक), बागलाणी, भिल्ली (खानदेश), भिल्ली (सातपुडा), देहवाळी, कोटली, भिल्ली (निमार),कोहळी, कातकरी, कोकणा, कोरकू, परधानी, भिलालांची निमाडी, मथवाडी, मल्हार कोळी, माडिया, वारली, हलबी, ढोरकोळी, कुचकोरवी, कोल्हाटी, गोल्ला, गोसावी, घिसाडी, चितोडिया, छप्परबंद, डोंबारी, नाथपंथी डवरी, पारोशी मांग, बेलदार, वडारी, वैदू, दखनी उर्दू, महाराष्ट्रीय सिंधी, मेहाली, सिद्दी, बाणकोटी,चित्पावनी, वाघ्ररी / वाघरी, पारधी, गोंडी,गोरमाठी,लेवा,डांगी,वाडवळ / वडवली/ळी, कैकाडी,अहिराणी, कदोडी / सामवेदी, तावडी, आगरी, देहवाली, जुदाव, महाराऊ, भिलाऊ, लाड सिक्की, लेवापातीदार, गुजरी, वगैरे.
  • मराठवाडी - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्य़ात ही बोलीभाषा वापरली जाते. काही वेळा क्रियापदांवर कानडी भाषेचाचा परिणाम होतो परंतु प्रभाव मात्र नाही. या भाषेत उर्दू शब्दही आढळतात. 'लाव', 'लास', 'आव' या स्वरूपाचे कारकवाचक प्रत्यय या बोलीचे वेगळेपण दाखवतात. उदा. जेवलालाव, चाल्लास, ठिवताव इत्यादी.
  • मालवणी - दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बोलली जाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. हेल काढून आलेले अनुनासीक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. दशावतार या नाट्याचे सादरीकरण या भाषेतच केले जाते. मच्छिंद्र कांबळी यांच्या मालवणी नाटकांमुळे ही भाषा जास्त प्रसिद्धी पावली. मालवणी बोलीत अनेक वैशिष्टय़पूर्ण शब्द आहेत. जसे की, झिल (मुलगा), चेडू (मुलगी), घोव (नवरा).
  • झाडीबोली - भंडारागोंदियाचंद्रपूर आणि गडचिरोली हा चार जिल्ह्य़ांचा भूप्रदेश 'झाडीपट्टी' म्हणून ओळखला जातो. या भागातील बोलीभाषेला झाडीबोली असे म्हणतात. मराठीतील 'ण, छ, श, ष आणि ळ' ही पाच व्यंजने झाडीबोलीत वापरली जात नाहीत. मराठीतील आद्यग्रंथ मुकुंदराजकृत 'विवेकसिंधू'मधील अनेक अपरिचित शब्द आजही झाडीबोलीत प्रचारात आहेत.
  • नागपुरी - पूर्व विदर्भातील नागपूरवर्धाचंद्रपूर जिल्ह्यांचे काही भाग आणि गडचिरोलीचा काही भाग तसेच भंडारा (गोंदिया) या जिल्हय़ांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. तसेच मध्य प्रदेशातील शिवनीछिंदवाडाबालाघाट व रायपूर या भागातही ही बोली प्रचलित आहे. वऱ्हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. नागपुरीला वऱ्हाडी भाषेचेच एक रूप मानल्याने नागपुरी बोलीचा स्वतंत्र भाषिक अभ्यास झाला नाही. परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली जाते. यावर हिंदी शब्दांचाही प्रभाव आढळतो.
  • अहिराणी - जळगाव जिल्हा सावळदबारा, बुलढाणा जिल्हा, मलकापूर ते मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शहापूर, अंतुर्लीपर्यंतच्या विस्तृत भूप्रदेशात ही बोलीभाषा प्रचलित आहे. शब्दांमध्ये नाद आणि लय हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. भालचंद्र नेमाडेना. धों. महानोर, के.नारखेडे या लेखकांनी आपल्या साहित्यात बोलीचा वापर केला आहे.
  • तावडी - जामनेरभुसावळजळगाव, बांदवर, रावेरयावल तालुका या भागात तावडी बोली प्रचलित आहे. तावडी बोलीत मोठय़ा प्रमाणात आहेत. 'क' च्या जागी 'ख'चा उच्चार केला जातो. उदाहरणार्थ- डोखं (डोकं), मोखा (मोका). बहिणाबाई चौधरींच्या कवितांमधून तावडी बोलीचा आविष्कार दिसतो. पुर्वी या बोलीला अहिराणी समजत असत परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली गेली.
  • आगरी - आगरी बोली ही महाराष्ट्राच्या राज्याच्या उत्तर आणि मध्य कोकणात बोलली जाते. आगरामधले आगरी, गवळी व कुणबी तसेच किनारपट्टीवरील कोळी, खारवी, भंडारी व भोई ही बोली बोलतात. रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये ही आगरी बोलणारे लोक प्रामुख्याने आढळतात.
  • चंदगडी - कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही भाषा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भागात ही भाषा प्रचलित आहे. या भूभागात दोन भिन्न भाषा-बोलींचा संपर्क, विविध राजकीय अंमल, मराठी, कन्नड आणि कोकणी भाषेच्या प्रभावाखाली तयार झालेली ही एक बोली भाषा आहे. उच्चाराचा विशिष्ट हेल, सुरावट आणि निराळे व्याकरण हे या भाषेत दिसून येते. चंदगड तालुक्याचा पश्चिम भाग, दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्याच्या सीमेलगतची गावे, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावे ती कोकणीच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरतात. चंदगडच्या पूर्व भागात आणि बेळगाव परिसरातील गावांमध्ये कन्नड भाषेच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरात आहे. या मध्ये 'मिय्या जेवलो' (मी जेवले), 'मिय्या बाजारास गेल्लो'(मी बाजारात गेले) अशी शब्द रचना दिसते. तसेच 'कोठे'ऐवजी 'खट्टे' असा शब्द ऐकू येतो.
  • वऱ्हाडी - बुलढाणावाशीमअकोलायवतमाळअमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्य़ांतून वऱ्हाडी बोलली जाते. म्हाइंभट यांचा 'लीळाचरित्र' हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वऱ्हाडी बोलीत लिहिला गेला. महानुभाव पंथातील अनेक रचना याच बोलीतून झाल्या आहेत. प्रमाण मराठीतील 'ड'चा 'ळ', 'ळ'चा 'य' या बोलीत केला जातो. जसे, 'नदीच्या गायात, गाय फसली' (नदीच्या गाळात गाय फसली). तसेच जो हा प्रत्यय असलेली देईजो, येईजो, घेईजो अशी रूपे येतात. फारशी व हिंदीचा प्रभाव या बोलीवर आहे.
  • देहवाली - भिल्ल समाजात ही बोली आढळते. गुजराती आणि हिंदी भाषेचा यावर मोठा प्रभाव आढळतो. बोलीची गुजरातीशी वाक्यरचनाही मिळतीजुळती आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे. या भाषेचे खळवाड आणि मेवासी असे दोन पोटप्रकारही आहेत. देहवाली च्या मूळ स्वरात 'ळ', 'क्ष' आणि 'ज्ञ' ही व्यंजने नाहीत, तर 'छ', 'श' आणि 'ष' यांच्याऐवजी 'स' हे एकच व्यंजन वापरले जाते. या भाषेचे अभ्यासक चामुलाल राठवा यांनी देहवाली मौखिक साहित्य शब्दबद्ध केले आहे. विश्राम वळवी, देवेंद्र सावे, बळवंत वळवी, सोबजी गावीत यांनी या भाषेत लेखन केले आहे. भाषासाहित्य प्रकल्पाअंतर्गत अकादमी द्वारे हे प्रसिद्धही झाले आहेत.
  • कोल्हापुरी - कोल्हापुर भागात बोलली जाणारी ही बोली आहे. बोलीभाषापैकी कोल्हापुरी मराठी बोली ही निष्कपट, गरीब, खेडवळ, अशिक्षित शेतकऱ्याची बोली आहे. लय काढून बोलण्याची लकब या भागात आढळते. तसेच कोकणी भाषेचा प्रभाव यावर दिसतो. भाषेत रांगडेपणा व शिव्यांचा वापर आढळतो. श्रीविष्णूच्या गर्भश्रीमंत तिरुपति रूपापेक्षा, त्याच्या अस्सल शेतकरी वेषातल्या पंढरपूरच्या विठोबाच्या रूपाला, अथवा श्रीशंकराच्या मल्हारी /खंडोबाला मनोभावे भजणाऱ्या- पुजणाऱ्या रांगड्या शेतकऱ्यांच्या मुखांतून उमटणारी ही बोलीभाषा आहे. मराठी भाषेच्या विविध धाटणींच्या बोलींपैकी पुणेरी मराठी बोली ही ज्यास्तीत ज्यास्त व्याकरणशुद्ध म्हणून ओंळखली जाते, तथापि ती बहुतांशी लेखी लिपीनुसार बोलली जात असल्यामुळे ऐकण्यास नाटकी आणि सपक वाटते.  तुलनेने ह्या अस्सल रांगड्या भाषेतल्या बोली कानांना अधिक रसरशीत, ठंसकेबाज आणि दमदार वाटतात. तिरुपती आणि विठोबातल्या फरकासारखाच हाही फरक आहे.
  • बेळगावी - बेळगाव या सीमाभागातील ही बोलीभाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींच्या मिश्रणातून तयार झालेली आहे. या भाषेतील गोडव्याची ओळख पु.ल. देशपांडे यांच्या रावसाहेब या कथेने करून दिली. त्याच बरोबर भीमराव गस्ती, नारायण अतिवाडकर या साहित्यिकांनीही या भाषेतून लेखन केले आहे. प्रकाश संत लिखित लंपन या व्यक्तिचित्रात या भाषेला विपुल वापर आढळतो. जसे काय लंपूसाहेब, ओठ बाहेर काढून बसून सोडलात आज, सक्काळी सक्काळी.. एकदम मज्जा ऐद नोडरी ऽऽ अभ्यास इल्ला एन इल्ला... या भाषेत गा हा प्रत्यय लावला जातो जसे 'काय गा कव्वा येत्यास?' (काय, केव्हा येणार?)
  • वाडवळी - उत्तर कोकणातील ठाणे जिल्ह्य़ात सागरी किनाऱ्यालगतच्या भागात वाडवळी बोली बोलली जाते. या भागात सोमवंशी पाठारे क्षत्रिय व सोमंवशी क्षत्रिय समाजास शेतीवाडी हा व्यवसाय करणारे म्हणून ‘वाडवळ’ असे नामाभिधान पडले आहे. या समाजाच्या बोलीभाषेस ‘वाडवळी’ असे संबोधले जाते. तिचा उगम आणि विकास बहुतांशी ठाणे जिल्ह्यात झालेला दिसतो. ही बोली वसई परिसरात बोलली जाते.
वऱ्हाडी: जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची बोलीभाषा दर १२ कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत व वाक्प्रचारांत बदलत रहाते. असे असले तरी लिखित भाषेत फारसा फरक नसतो.

वऱ्हाडी प्रामुख्याने विदर्भाच्या वऱ्हाड भागात म्हणजे अमरावतीअकोला, बुलढाणा, यवतमाळवाशीम या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात बोलली जाते. या बोलीची पाळेमुळे १२व्या शतकातल्या, चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथाच्या उदयापर्यंत जातात. अलीकडच्या काळातही अनेक कवींनी त्यांच्या कवितांत अंशतः किंवा संपूर्ण वऱ्हाडीचा वापर केला आहे. उद्धव शेळके, मनोहर तल्हार, मधुकर केचेगो.नी. दांडेकर, बाजीराव पाटील, नरेंद्र इंगळे, सदानंद देशमुख, रमेश इंगळे उत्रादकर, पुरुषोत्तम बोरकर, आणि इतर अनेक असे लेखक/कवी आहेत की ज्यांनी या बोलीचे सौंदर्य व ताकद वाढवण्यास हातभार लावला आहे. तिसापेक्षाही जास्त वर्षांपासून डॉ.प्रा.विठ्ठल वाघ या बोलीत कविता लिहीत आहेत. त्यांनी वऱ्हाडी बोलीवर एक शोधप्रबंध लिहिला आहे. वऱ्हाडी बोलीभाषेतील म्हणी हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. वाघ यांनी त्यांच्या काव्यगायनाद्वारे, महाराष्ट्राच्या इतर भागांतही वर्‍हाडीला लोकप्रियता मिळवून दिली आहे. मराठीच्या अन्य बोलीभाषांनी केली आहे तशी वऱ्हाडीनेही मराठी भाषा जास्त खुमासदार केली आहे. डॉ. प्रा. विठ्ठल वाघ यांच्या या बोलीभाषेतील कवितांमध्ये,काया मातीत मातीत, तिफन चालते हे एक गाजलेले चित्रपटगीत आहे.
या बोली भाषेत काही उपप्रकार आहेत. उदा० खडसी वऱ्हाडी, देसी वऱ्हाडी, वरतील्ली, खाल्तील्ली इत्यादी. या उपप्रकारांत थोडयाफार फरकाने शब्द बदलतात. उदा० बैलगाडीला देसी (देस पट्टी)मध्ये 'बंडी' तर खडसी (खडसपट्टी)मध्ये 'खासर' म्हणतात.
अहिराणी ही एक मराठीची बोलीभाषा आहे. ही प्रामुख्याने खानदेश प्रदेशात बोलली जाते. जळगाव,धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचा काही भाग आणि नाशिक जिल्ह्याच्या कलवण, सटाणा, मालेगाव व देवळा या तालुक्यांत ती बोलली जाते. या भूप्रदेशातील लोक अहिराणी बोलत असले, तरीही वाचन आणि लेखन यांसाठी प्रमाण मराठीचा वापरण्याचा कल आढळतो.

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

जुन्या खानदेश परिसरात म्हणजे अजिंठ्याचे डोंगर, सातपुड्याचे डोंगर, चांदवडचे डोंगर आणि वाघूर नदी या खोल खाणी-खदाणीत वास्तव्यास असलेले अहिर लोक अहिराणी बोलत[१]. खानदेश परिसरातील अहिरांच्या वास्तव्यामुळे, सत्तेतील त्यांच्या प्राबल्यामुळे, त्या परिसरातील सर्वांच्या बोलीवर अहिराणी बोलीची छाप पडली. यातून खानदेशाचे सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेद झाले आहेत. प्रदेशानुसार बगलांनी, नंदुरबारी, खाल्यांन्गी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी हे बोलीभाषांतील प्रादेशिक प्रभेदांत, तर जातिवाचक बोली ह्या सामाजिक प्रभेदांत मोडतात. खानदेशातील सर्व जातींची बोली ही अहिराणीची छाप असणारी बोली आहे. या सामाजिक प्रभेदांत महाराऊ, भिलाऊ, लाड सिक्की, लेवापातीदार, गुजरी, इत्यादी सामाजिक प्रभेदाच्या बोली आहेत. खानदेशात बोलली जाते ती खानदेशी, असे असल्याने खानदेशी ही संकल्पना अहिराणी ह्या संकल्पनेहून विशाल आहे.
जवळपास ९५% टक्के खानदेशी माणसे अहिराणी बोलतात. ती त्यांची बोलीभाषा आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद तथा नाशिक जिल्ह्याच्या काही भागात अहिराणी भाषा बोलतात. उत्तर महाराष्ट्राच्या अमळनेर, साक्री, पारोळा, दोंडाईचा, शिरपूर, तळोदा, शहादा, धडगाव, नवापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, अक्कलकुवा, सिंदखेडा, चोपडा, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, बागलाण ह्या तालुक्यातील बहुतेक सर्व जाती जमातीची ती मायबोली भाषा आहे.गुजरातच्या, सुरत, सोनगढ, व्यारा, उच्छल, निझर व मध्यप्रदेशच्या खेतिया, पानसेमल, संधवा आणि काही तालुक्यातही अहिराणी भाषा बोलतात.

शब्दकोश[संपादन]

  • नि. रा. पाटील यांनी खानदेशी भाषेवर आधारित ‘लेवा गण बोली’ भाषेचा शब्दकोश तयार केला आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. वर उडी मारा सूर्यवंशी,रमेश. अहिराणी बोली - भाषा वैज्ञानिक अभ्यास(मराठी मजकूर) 
झाडीबोली नावाची एक बोली महाराष्ट्र राज्याच्या ईशान्य दिशेला असलेल्या काही भागात बोलली जाते.. महाराष्ट्र­ाच्या भंडारागोंदियाचंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली 'झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाटदुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूरजिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषिक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष लोक झाडीबोली बोलतात.संदर्भ हवा ]

झाडीबोलीची वैशिष्ट्ये[संपादन]

झाडीबोलीतील काही खास शब्द[संपादन]

लोकसाहित्य[संपादन]

झाडीबोलीत लोकसाहित्याचे आहे. क्रीडागीतेपाळणागीतेसासुरवाशिणीची गीते असे प्रकार आहेत. रोवण्याची गाणी . महादेवाची गाणीबिरवे
भिंगीसोंग आणि दंडीगान . दंडार, खडीगंमत, गंगासागर, डाहाका आणि गोंधड काव्यप्रकार आहेत.

नियतकालिके[संपादन]

झाडीबोलीचे स्वत:चे मासिक आहे. डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या संपादकत्वाखाली 'लाडाची बाई' हे बाल मासिक झाडीबोलीत (देवनागरी लिपीत) भाषेत जानेवारी २०१०पासून प्रकाशित होत आहे. हे झाडी भाषेतील पहिले मासिक आहे. संदर्भ हवा ]

प्रकाशित साहित्य[संपादन]

झाडीबोलीत सर्व प्रथम लेखन प्रकाशित करण्याचा मान डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांच्याकडे जातो. 'पवनपर्व' या साकोली येथून दर रविवारी प्रकाशित होणार्‍या ’रविवासरी’ नावाच्या साप्ताहिकात 'वद्राचा देव खाल्या आला' ही त्यांची झाडीबोलीतील कथा १६ मार्च १९८०च्या अंकात प्रकाशित झाली. ही झाडीबोलीतील पहिली प्रकाशित कथा होय.संदर्भ हवा ] तसेच याच नियतकालिकात 'अडचा घुटाची भूक' ही त्यांची झाडीबोलीतील कविता २० मार्च १९८१ च्या अंकात प्रकाशित झाली. ही झाडीबोलीतील पहिली प्रकाशित कविता समजली जाते.[संदर्भ हवा ]
'झाडीबोलीचे भाषावैज्ञानिक अध्ययन' ह्या विषयावर डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी पीएच.डी.चा प्रबंध लिहिला होता.
झाडीबोली साहित्य मंडळाने मराठी बोली साहित्य संघ ही संस्था १५ ऑगस्ट २००३ रोजी स्थापली.

कविता संग्रह[संपादन]

  • सपनधून (कवी ना.गो. थुटे -१ जानेवारी २०००) हा झाडीबोलीतील पहिला प्रकाशित कवितासंग्रह.
  • अंजनाबाईची कविता (कवयित्री अंजनाबाई खुणे -९ जाने २०००)
  • आदवा (चारोळीसंग्रह-कवी राजन जयस्वाल -९ जानेवारी २०००)
  • हिरवा पदर (कवितासंग्रह कवी हिरामन लांजे(रमानंद) -२००२)
  • रूप झाडीचा (वा.चं. ठाकरे -२००२)
  • कानात सांग (डॉ. हरिश्चंद्र बोरकर -२००२)
  • माज्या मुलकाची कता (विठ्ठल लांजेवार -२००२)
  • झाडीपट्टीचा बारसा (रामचंद्र डोंगरवार -२००३)
  • झाडी भुलामाय (प्र.ग. तल्लारवार(प्रगत) -२००६)
  • आदवा(कवितासंग्रह कवी राजन जयस्वाल -२००४)
  • अंजनाबाईची गाणी(अंजनाबाई खुणे -२००५)
  • सोनुली (पांडुरंग भेलावे -२००६)
  • मातीत मिरली माती' (मुरलीधर खोटेले -२००७)
  • माजी मायबोली (बापुराव टोंगे -२००८)
  • झाडीची माती (मिलिंद रंगारी -२००८)
  • मोहतेल (प्रल्हाद मेश्राम)
  • रंगल्या तांदराचा सडा (मनराज पटेल)
  • घामाचा दाम (डोमा कापगते)
  • कविता झाडीची (झाडीबोलीतील २५ उत्कृष्ट कवितांचा संग्रह - संपादक डॉ. हरिश्चंद्र बोरकर, ना. गो. थुटे -२००२) इत्यादी.

कथासंग्रह[संपादन]

  • वास्तुक (घनश्याम डोंगरे -.१९९८) झाडीबोलीतला पहिला कथासंग्रह.
  • पोरका (मा.तु. खिरटकर -२००१
  • गंप्याची बंडी (दिवाकर मोरस्कर -२००१)
  • विश्वंभरा (सुमिता कोंडबत्तुनवार -२००२)
  • चटनीचा पेंड (वा.चं. ठाकरे -२००८)
  • कवितेत रंगल्या कता (बापुराव टोंगे -२००९)
  • झाडीबोलीतील सर्वोत्कृष्ट कथांचा संग्रह 'जागली'( संपादक, राजन जयस्वाल -२००१)

कादंबऱ्या/चरित्रे[संपादन]

  • झाडीचा झोलना (आत्मचरित्र, अंजनाबाई खुणे -२०१२)
  • बाप्तिस्मा ते धर्मांतर (आत्मकथन-इसादास भडके)
  • भाराटी (घनश्याम डोंगरे)

अन्य साहित्य[संपादन]

  • झाडीबोली भाषा आणि अभ्यास (डॉ.हरिश्चंद्र बोरकर)
  • झाडीबोली-मराठी शब्दकोश (डॉ.हरिश्चंद्र बोरकर)

पुरस्कार[संपादन]

  • ’भाराटी' ला नाशिक येथील प्रतिष्ठेचा बंधुमाधव पुरस्कार मिळाला.
  • ”बाप्तिस्मा ते धर्मांतर’ला महाराष्ट्र­ शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारांसह अनेक पुरस्कार लाभलेले आहेत.
  • डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या 'झाडी बोली : भाषा आणि अभ्यास' आणि 'भाषिक भ्रमंती' या दोन ग्रंथांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.

झाडीबोली साहित्य संमेलने[संपादन]

  • १९ जानेवारी १९९२ रोजी रेंगेपार (कोहळी) या गावी झाडीबोली साहित्य मंडळाच्या ध्वजाखाली पहिले झाडीबोली साहित्य संमेलन झाले. आजतागायत (इ.स.२०१५) शासकीय मदतीशिवाय या मंडळाने बावीस साहित्य संमेलने घेतली आहेत.
  • इ.स. १९९५च्या सेंदूरवाफा येथील तिसर्‍या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिवंगत प्रा. द.सा.बोरकर यांनी भूषविले होते.
  • १२व्या संमेलनाच्या अध्यक्षा अंजनाबाई होत्या.
  • १८वे झाडीबोली साहित्य संमेलन - १९-२० डिसेंबर २०१०. बोंडगावदेवी (गोंदिया जिल्हा) येथे.
  • १९वे, २४-२५ डिसेंबर २०११, भजेपार (अंजोरा) येथे; अध्यक्ष कवी व कथाकार राम महाजन
  • २०वे झाडीबोली संमेलन, ७-८ जानेवारी २०१३, नवेबांधगाव (गोंदिया) येथे; अध्यक्ष : नीलकंठ रणदिवे
  • २१वे झाडीबोली साहित्य संमेलन : ११-१२ जानेवारी २०१४, आसगाव तर्फे पवनी येथे; अध्यक्ष : बापूरावजी टोंगे
  • २२वे झाडीबोली साहित्य संमेलन १० जानेवारी २०१५ रोजी गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा या गावी झाले. साहित्यिक धनंजय ओक या संमेलनाचे (बहुधा) अध्यक्ष असावेत.
  • २४वे झाडीबोली साहित्य संमेलन जानेवारी २०१७
डोंबिवली येथे फेब्रुवारी २०१७मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी झाडीपट्टीतील साकोली येथील जनसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. विदर्भ साहित्य संघाच्या संमेलनाच्या तळोधी-बाळापूर येथील संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. मतांसाठी जोगवा मागताना डॉ. काळे यांनी काढलेल्या विनंती पत्रकात अनेकांच्या नावांसोबत झाडीबोली साहित्य मंडळाच्या अध्यक्षांचेही नाव आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. काळे यांच्या समक्ष झाडीबोलीची उपेक्षा होते ही अतिशय वेदनादायक बाब आहे. डोंबिवली संमेलनात माझे नाव सोडा, पण डॉ. राजन जयस्वाल, लखनसिंह कटरे, हिरामण लांजे, ना. गो. थुटे, डॉ. तीर्थराज कापगते यापैकी एखाद्याला तरी आमंत्रित करायला हवे होते, असे डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी नमूद केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील खास बोलींवरील परिसंवादात झाडीबोलीचा एकही प्रतिनिधी नाही. हे सारे अनवधानाने किंवा अज्ञानामुळे संबंधितांकडून घडले असावे, त्यामागे कोणताही दुष्ट अथवा वावगा हेतू नव्हता अशी वस्तुस्थिती असेल तर या चुकीच्या संदर्भात निदान दिलगिरीच्या पत्राची अपेक्षा आणि प्रतीक्षा करणे झाडीबोली चळवळीला आणि समस्त झाडीभाषकाला अयोग्य नाही ना?
- डॉ. हरिश्चंद्र बोरकर

झाडीपट्टी परिवर्तनशील साहित्य संमेलन[संपादन]

  • १ले : येरंडी(तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया); २३-३-२०१२

हे सुद्धा पहा[संपादन]

या भाषेतील काही शब्द व त्याचे मराठीतील अर्थ[संपादन]

झाडीबोलीतील शब्दमराठीतील त्या अर्थाचा किंवा
त्याचे जवळपास पोचणारा शब्द
बंडीबैलगाडी
वद्रवरती/वरचे बाजूस
खाल्तंखाली/खालचे बाजूस
चेंगणेचढणे
खासरखाचर
काह्यलेकशाला
पुन्नाहुनपुन्हा/परत
ऊबारजास्तीचा
काउनकां म्हणून
गेल्तागेला होता
माह्यासंगमाझे सोबत
बंडी उलार(बंडीचे चाकाच्या/अक्षाच्या मागच्या
बाजूस जास्त भार लादल्याने समोरची
बाजू वर होण्याची स्थिती)
शेयरातशहरात
गावालेगावाला
तेथंतिथे
येथंयेथे
कऊलकवेलू (Roof Tile)
जगरंकुंभाराने, कच्चे मातीचे मडके भाजण्यासाठी
रचलेली गवऱ्यांची(शोभण्या) आरास)
घेवालेघ्यायला
जावालेजायला
भासरानवऱ्याचा मोठा भाऊ/ दिर
आढंमाळा/गच्ची/छत
खातीलोहार
सालदार (साल=वर्ष)वर्षाचे कराराने ठेवलेला शेतीवरील
काम करण्यासाठीचा नोकर
तांदुरतांदुळ